सौजन्य -Maharashtra Times

पाकिस्तानी लष्कराच्या ताब्यात असलेले धुळ्यातील लष्करी जवान चंदू चव्हाण यांच्या आजीचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. आपला नातू पकडला गेल्याचा धक्का सहन न झाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.
Read more...
भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढलेला असतानाच जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथील बेही बाग भागात संयुक्त गस्त घालत असताना पोलीस आणि सीआरपीएफच्या पथकावर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याचे वृत्त आहे. भारतीय जवानांकडून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जात असून सध्या जोरदार धुमश्चक्री सुरू असल्याचे सांगण्यात आले.
Read more...
चुरशीच्या अंतिम सामन्यात शेवटच्या मिनिटाला निर्णायक गोल डागून बांगलादेशचा पराभव करत भारताने १८ वर्षांखालील मुलांच्या आशिया कप हॉकी स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. उपांत्य सामन्यात पाकिस्तानला नमवून भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
Read more...
नियंत्रण रेषेच्या पलिकडे जाऊन दहशतवादी अड्डे उध्वस्त करण्याच्या भारतीय लष्कराच्या मोहिमेमध्ये पंजाब रेजिमेंटचे लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. निंभोरकर हे वर्ध्याचे सुपुत्र आहेत.
Read more...
भारताने बहिष्कारास्त्र उगारल्यानंतर अन्य चार देशांनीही भारताच्या सूरात सूर मिसळल्याने कोंडीत सापडलेल्या पाकिस्तानने अखेर नोव्हेंबरमध्ये होणारी सार्क देशांची शिखर परिषद पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानकडून अधिकृतपणे हे स्पष्ट करण्यात आले.
Read more...
'सलमान खानला चित्रपटात ज्या गोळ्या लागतात त्या नकली असतात. तो नंतर उठून उभा राहतो पण सीमेवर भारतीय जवानांना खऱ्या गोळ्या झेलाव्या लागतात. त्या फिल्मी नसतात', असा टोला हाणत पाकिस्तानी कलाकारांची कड घेणाऱ्या अभिनेता सलमान खानवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'टाइम्स नाऊ'शी बोलताना सडकून टीका केली आहे.
Read more...