नवनियुक्त शिक्षण उपसंचालक साहेबांची साप्ताहिक भ्रष्टाचार पेपरचे संपादक श्री किशोर सोनवणे यांनी घेतली भेट
जळगाव जिल्ह्यात शिक्षण खात्यात सुरु असलेल्या भ्रष्टाचाराची मांडली गाथा
नाशिक येथे नुकतेच बदलून आलेले कर्तव्यदक्ष शिक्षण उपसंचालक श्री राठोड साहेब यांची साप्ताहिक भ्रष्टाचार न्यूज चे मुख्य संपादक श्री किशोर अरुण सोनवणे यांनी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर साहेबांसोबत बोलताना श्री किशोर सोनवणे यांनी जळगाव जिल्ह्यात सुरु असलेली बोगस बॅक डेट शिक्षक भरती आणि त्यावर येथील अधिकारी यांनी जाणीवपूर्वक संथगतीने सुरु केलेली कारवाई आणि माध्यमिक शिक्षण विभागात कशाप्रमाणे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे व भ्रष्टाचाराला याच विभागातील काही मंडळी कशी मदत करतात याची सर्व माहिती साहेबाना दिली.तसेच जितक्या जास्त तक्रारी शाळेच्या येतात तितका जास्त फायदा येथील अधिकारी चिरीमिरी करून घेतात त्या संदर्भात पण माहिती दिली. त्यानंतर शिक्षण विभागातील काही लोकांची नातलग मंडळी बोगस बॅक डेट शिक्षक भरतीसाठी परस्पर कशी वसुली करतात याची देखील माहिती दिली.
त्यानंतर साहेबांनी तेथे कार्यरत कर्मचारी यांना तात्काळ सूचना करत किशोर सोनवणे यांनी ज्या ज्या शाळेच्या तक्रारी केल्या आहेत त्याची सर्व माहिती तात्काळ माझ्या कडे पाठवण्यात यावी अशी सूचना केली.
साहेबांची भेट घेतली असता त्यांच्या बोलण्यावरून आता शिक्षण विभागाला नक्कीच सुगीचे दिवस येतील आणि भ्रष्टाचार करणारी मंडळींना चाप बसेल अशी शास्वती वाटत आहे.
